Post Details

पुणे मेट्रोच्या विस्तारीकरणासंदर्भात केंद्रीय मंत्री मा.श्री. मनोहरलाल खट्टर जी यांची भेट…

Amit Shah -

पुणे मेट्रोच्या विस्तारीकरणासंदर्भात केंद्रीय मंत्री मा.श्री. मनोहरलाल खट्टर जी यांची भेट… 📍नवी दिल्ली आपल्या पुणे शहराचा वाढता विस्तार लक्षात घेता मेट्रो प्रकल्पांना गती देण्यासंदर्भात केंद्रीय नगरविकास मंत्री मा.श्री. मनोहरलालजी खट्टर यांची नवी दिल्ली येथे भेट घेत सविस्तर चर्चा केली. वनाज ते चांदणी चौक आणि रामवाडी ते वाघोली या विस्तारीत टप्प्यांना केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी देणे तसेच खराडी-हडपसर-स्वारगेट-खडकवासलासोबतच नळ स्टॉप-वारजे-माणिक बाग या टप्प्यांना पब्लिक इन्व्हेस्टमेंट बोर्डाची मान्यता मिळविण्यासंदर्भात यावेळी चर्चा केली. या दोन्ही विषयांसंदर्भात मा. खट्टर जी यांनी सकारात्मकता दर्शवली. पुणे मेट्रोचे दोन्ही मार्ग पूर्ण क्षमतेने सुरू असताना वनाज ते चांदणी चौक आणि रामवाडी ते वाघोली या मेट्रो मार्गाचे विस्तारीकरण प्रस्तावित आहे. यासाठी महा मेट्रोने सविस्तर विकास आराखडा तयार केला असून याला राज्य सरकारचीदेखील मंजुरी मिळालेली आहे. तसेच पब्लिक इनव्हेसमेंट बोर्डाचीही मान्यता ११ मार्च २०२५ रोजी मिळाली असून आता केंद्रीय मंत्रिमंडळाची अंतिम मंजुरी प्रतीक्षात आहे. हा प्रस्ताव लवकरात लवकर केंद्रीय मंत्रिमंडळासमोर ठेवण्यात यावा, याबाबत चर्चा झाली. तसेच मेट्रोच्या विस्तारीकरणाचा भाग म्हणून खराडी-हडपसर-स्वारगेट-खडकवासला हा मार्गही दृष्टीक्षेपत असून सोबतच नळ स्टॉप-वारजे-माणिक बाग हा जोडमार्गही प्रस्तावित आहे. याही प्रकल्पाला राज्य सरकारची मंजुरी मिळाली असून आंतर मंत्रालयीन समिती आणि पीआयबीची मान्यता प्रतीक्षेत आहे .तसेच पीआयबीच्या मान्यनंतर मान्यतेनंतर सदर प्रस्ताव केंद्रीय मंत्रिमंडळात ठेवण्यात यावा, याबाबतही सकारात्मक चर्चा झाली. पुणे शहरातील मेट्रो प्रकल्पांना गती देण्याची मोदी सरकार आणि मा. देवेंद्रजींच्या नेतृत्वातील महायुती सरकारची भूमिका असून नवे प्रस्तावित मार्ग लवकरात लवकर मार्गी लावण्याचा आमचा प्रयत्न आहे. संपूर्ण शहरभर मेट्रोचे जाळे तयार करताना त्याला आणखी वेग यावा, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. दोन्ही विषयांबाबत मा. खट्टरजींशी सकारात्मक चर्चा झाली असून याबाबत लवकरच सकारात्मक निर्णय होईल, हा विश्वास वाटतो. narendramodi amitshahofficial jpnaddaofficial mlkhattar bjp4india devendra_fadnavis ckbawankule ravindrachavanofficial bjp4maharashtra bjp4punecity

Post media
Current Metrics
  • Likes 8832
  • Shares
  • Comments 12
  • Replies
Sentiment Analysis
Score 0.00
Label neutral
Metrics History
Date Likes Shares Comments
Jun 03, 2025 07:08 8826 12
Jun 03, 2025 07:14 8826 12
Jun 03, 2025 07:26 8832 12
Ask